पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ पुरस्कार प्रदान

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

    बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना करणारे स्वातंत्र्यसैनिक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या कुटुंबियांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मरणोत्तर ‘भारतरत्न‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    Pandit Madan Mohan Malavia
  • पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म अलाहाबाद येथे २५ डिसेंबर १८६१ रोजी झाला. तर बनारस येथे १२ नोव्हेंबर १९४६ रोजी देहावसन झाले.
  • मालवीय हे भारतीय शिक्षणतज्ज्ञ तथा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते. अखिल भारतीय कॉंग्रेसचे १९०९ आणि १९१८ असे दोनवेळा अध्यक्ष होते.
  • एप्रिल १९१६ साली ऍनी बेझंट यांच्यासह अन्य विश्वस्तांसमवेत वाराणसीला बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचा  जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठात समावेश असून हे भारतातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. मालवीय यांनी १९१९ ते १९३८ दरम्यान या विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले.
  • अलाहाबाद मधून प्रकाशित होणाऱ्या ‘द लिडर’ या नामवंत वृत्तपत्राची १९०९ मध्ये स्थापना केली. १९२४ ते १९४६ दरम्यान ते ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वृत्तपत्राचे अध्यक्ष. त्यांच्या पुढाकाराने १९३६ साली "हिंदुस्थान टाईम्स'च्या हिंदी आवृत्तीचा प्रारंभ.
  • आई मुनादेवी तर वडिल ब्रिजनाथ. मूळ मध्य प्रदेशमधील मालवाचे. त्यामुळे मालवीय म्हणून परिचित. तसेच पूर्वजांना संस्कृत विषयात शिष्यवृत्ती मिळाल्याने कुटुंब सुपरिचित.
  • वयाया पाचव्या वर्षापासून संस्कृतमधून शिक्षणास प्रारंभ. हरदेवा यांच्या धर्म ज्ञानोपदेश पाठशाळेमध्ये तसेच विद्यावर्धिनी सभेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण. त्यानंतर अलाहाबाद जिल्हा शाळेत प्रवेश. अलाहाबादमध्ये शिक्षणादरम्यान मकरंद नावाने काव्यलेखनास प्रारंभ. काही नियतकालिकांमध्ये कविता प्रकाशित. १८७९ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना कोलकाता विद्यापीठातून पदवी. जुलै १८८४ मध्ये अलाहाबाद जिल्हा शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात.
  • तत्कालिन परंपरेनुसार वयाच्या १६ व्या वर्षी मिर्झापुरच्या कुंदन देवी यांच्याबरोबर विवाह. त्यांना एकूण दहा अपत्ये झाली. त्यापैकी रमाकांत, राधाकांत, मुकुंद, गोविंद, रमा आणि मालती याच जगू शकल्या. गोविंद हे स्वातंत्र्यसैनिक तसेच १९६१ पर्यंत भारतीय संसदेचे सदस्य होते. तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरुही होते.
  • अखिल भारतीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथे दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये मालवीय यांचे भाषण गाजले. भाषणामध्ये त्यांनी ब्रिटिश कौन्सिलमध्ये प्रतिनिधीत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
  • १८९१ मध्ये अलाहाबाद जिल्हा न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. नंतर १८९३ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात. त्यानंतर निवृत्ती पत्करून समाजासाठी जगण्याचा निर्णय. मात्र त्यानंतर १७७ स्वातंत्र्यसैनिकांना एका प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावल्याने ते पुन्हा न्यायालयात गेले आणि १५६ स्वातंत्र्यसैनिकांना निर्दोष सोडविले.
  • त्यानंतर १९१२ साली ब्रिटिश कौन्सिलचे सदस्य. त्यानंतर या कौन्सिलला परावर्तित करण्यात आलेल्या केंद्रीय ब्रिटिश कौन्सिल मध्येही १९२६ पर्यंत या कौन्सिलचे सदस्य.
  • १९२८ साली लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू यांच्यासह सायमन आयोगाविरुद्ध आंदोलन.
  • कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अल्पावधीत सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान ४५० कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह अटकेत.
  • मुसलमानांसाठी वेगळ्या मतदारसंघाच्या मुद्यावरून मतभेद निर्माण झाल्याने कॉंग्रेसमधून बाहेर पडून ‘कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षा’ची स्थापना.
  • ‘कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षा’ने १९३४ साली ब्रिटिश कौन्सिलमध्ये निवडणूक लढविली आणि १२ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी ठरले.
  • ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य मालवीय यांनी लोकप्रिय केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा